उमरगा / माधव सूर्यवंशी

मानवाला अथक परिश्रम करूनही मनाजोगे लक्ष्मी व सत्ता प्राप्त होत नाही. परंतु कार्तिक स्वामी ही एकमेव अशी देवता आहे की, त्यांचे वर्षातून एकदाच दर्शन घेतल्याने आपली गरीबी नष्ट होवून सत्ता व लक्ष्मी प्राप्त होते. अशा कार्तिक स्वामीची यात्रा कर्नाटक राज्यात निसर्गरम्य अशा नरोणा ता. आळंद जि. गुलबर्गा येथे 18  नोव्हेंबर 2021 व 19 नोव्हेंबर 2021 रोजी मोठया उत्साहाने भरत आहे.

 कार्तिक स्वामी हे शिवपार्वतीचे मोठे पुत्र व भगवान गणेशाचे बंधू आहेत. महाराष्ट्रात त्यांना कार्तिक स्वामी व सहा तोंडे असल्याने षन्मुखानंद कर्नाटक षडानन व तसेच आंध्र् प्रदेशात सुबुम्हण्यम स्वामी या नावाने ओळखले जाते. देशामध्ये स्वामीचे दुर्मिळ मंदीर असून कर्नाटकात सांडूर व महाराष्ट्रात पुणे येथे पर्वती, नाशिक, कोल्हापूर, चिपळून येथे मंदिरे आहेत पण हे सर्व मंदिरे मानवनिर्मित केली आहेत. 18 पुराणापैकी स्ंकद पुराणातील उल्लेखाप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राने नरोणा या क्षेत्री मंदिराची निर्मिती केली आसून प्रत्यक्ष अनेक देवासह कार्तिक स्वामीचे वास्त्व या ठिकाणी आहे. म्हणून अशा पवित्र तिर्थ अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. पण हे पवित्र क्षेत्र प्रसिध्दी पासून दूर असल्याने अनेक भक्तांना याची माहिती नाही. कार्तिक स्वामींच्या दर्शनाने माणसाचे दारिद्रय् नष्ट् होवून तो ऐश्वर्यसंपन्न् होतो. नौकरीत बढती मिळते. संतती प्राप्त होते. राजकारणातील भक्तांना सत्ता प्राप्त होते. यासाठी कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्राच्या वेळेतच वर्षातून एकदाच दर्शन घेतल्याने भक्तांना हा लाभ् मिळतो. पण वर्षभरच त्यांच्या कृपाआशिर्वाद पाठीशी असतो. महाराष्ट्रात कार्तिक पोर्णिमा सोडून इतर वेळी महिला स्वामीचे दर्शन घेत नाहीत. पण या नक्षत्राच्या दिवशी वर्षातून एकदा महिलांनाही दर्शन घेता येते. 

गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी रात्री 01:30 ते शुक्रवार दुपारी 02:30 पर्यंत दर्शनयोग आहे. या वेळेत भक्तांना दर्शन घेता येते. दर्शनावेळी भाविकांनी दर्भ, तिर्थ, जानवे, मोराचे पीस, धूप, गोपीचंद, रुद्राक्ष माळ, पाण्याने भरलेला कमंडलु, पांढऱ्या फुलांचा हार, पेढे यापैकी जे काही मिळेल ते घेवून यावे. 

पुराणातील उल्लेखानुसार प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. रावण हा शिवभक्त व ब्राम्हण होता. या ब्रम्ह हत्येच्या मुक्तीसाठी आपल्या गुरुच्या आदेशानुसार तत्कालिन चिमनापूर या दंडकारण्यात भारतीय खंडात फार मोठया यज्ञाचे आयोजन केले होते. व आठ तिर्थ निर्माण करुन देशातील पवित्र नदयाचे पाणी आपल्या मंत्र सामर्थ्याने आणले व महादेवाची उपासना केली. यावेळी प्रत्यक्ष आई तुळजाभवानी, लक्ष्मी, सरस्वतीसह श्री. कार्तिक स्वामीही या क्षेत्री उपस्थित राहून रावणाच्या आत्म्यला शांती मिळवूनदिली व प्रभू  श्रीरामचंद्रालाही या ब्रम्ह हत्येतून मुक्त केले ते क्षेत्र म्हणजे आजचे नरोणा.

 निसर्गरम्य अशा परिसरात नरोणा येथून अवघ्या एक किलो मीटर लांबीवर असलेल्या क्षेमलिंगेश्वर या क्षेत्री भव्य असे शिवमंदिर असून या परिसरात 8 पाण्याचे मोठे कुंड असून शिवमंदिरासामोरील कार्तिक तिर्थ कुंडात पाण्यामध्येच कार्तिक स्वामीचे मंदिर असून भव्य अशी स्वामीची पुर्वाभिमुक नैसर्गिक मुर्ती आहे. त्यांच्या डोक्यावर मल्लीकार्जुन मंदिर आहे तसेच रामतिर्थ, लक्ष्मी तिर्थ, सरस्वती तिर्थ, भवानी तिर्थ, नरसिंह तिर्थ, रुद्रतिर्थ, सप्तऋषी तिर्थ असे आठ तिर्थ आहेत. या तिर्थत भाविकांनी स्नान करुन भगवान शिवाचे व कार्तिक स्वामीचे दर्शनघेतल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते व मनोकामना पूर्ण होते. यासोबत विर हनुमान व गणेश मंदिर सप्तऋषी पादुका कट्टा, अक्कमहादेवी मंदिर पाहण्यासारखे आहे. संपूर्ण मंदिराचे परिसर पाण्याखाली असून निसर्गाच्या अद्भूत चमत्कार पाहून माणसाचे मन प्रफुल्लित होते. नैसर्गिक आणि धार्मिक गंगोत्रीचा अनमोल संगम म्हणजे नरोणा. तसेच कडगंची गावात संपूर्ण विश्वात दत्त प्रभुंच्या गुरुचरित्र, या ग्रंथाचे पारायण केले जाते. त्या ग्रंथची निर्मिती कडगंची येथील सायंदेव दत्त मंदिरात झाली असून अनेकवेळी प्रत्यक्ष दत्त प्रभु अनेक भक्तांना दर्शन दिल्याचे आख्यायिका आहे. म्हणून या वेळी दत्तप्रभुचे दर्शन भक्तांना अवघ्या कडगंची पाटीपासून 1 कि.मी. आंतरावरील सायंदेव दत्तमंदिरात जाता येते. 

  महाराष्ट्रातील सीमेलगतच असलेल्या आळंद तालुक्यात नरोणा हे गांव आहे आळंदहून गाणगापूर-गुलबर्गा रोडवर कडगंची पाटी लागते. तेथून डावीकडे 10 किमी अंतरावर हे नरोणा तिर्थक्षेत्र असून गाणगापूरला व अक्कलकोट जाणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ घेता येतो. राहण्याची व प्रसादाची भक्तांसाठी कायम मोफत व्यवस्था असून यासाठी या संस्थानचे गुरु शिवयोगी चन्नवीर स्वामी यांच्या अशिर्वादाने श्री. गुरुपादलिंग महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली संस्थान कमिटीचे पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. 

अधिक माहितीसाठी 9960196244 / 9970766269 या मोबाईलवर संपर्क साधावा. मग येणार का? निसर्गरम्य दर्शनासाठी.

 
Top