उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग 211 (उस्मानाबाद - सोलापूर) या रस्त्यावरील उस्मानाबाद शहरांमधील MIDC उड्डाणपूल आणि वरुडा उड्डाणपूल यावरील आणि लगत असलेल्या सर्व्हीस रोड वरील विद्युत प्रकाशाच्या कामांची तात्काळ दुरुस्ती करून लायटींग सुरू करण्याबाबत  करण्याबाबत निर्देश खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  दिले.

 लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 व राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 च्या (लातूर - येडशी - टेंभुर्णी) या रस्त्याच्या कामाबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि.04 ऑक्टोबर रोजी आढावा बैठक घेतली. याबैठकीस प्रामुख्याने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर उपस्थित होते.

याप्रसंगी माजी उपसभापती श्री श्याम जाधव,  राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक, सोलापूर श्री कदम, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक नांदेड श्री सुनील पाटील, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे आदी अधिकारी उपस्थित होते.

 
Top