तुळजापूर/ प्रतिनिधी-

 नगर परिषदेची  सर्वसाधारण सभा  नगराध्यक्ष सचिन रोचकरीच्या अध्यक्षतेखाली  गुरुवार  दि .१६  रोजी  संपन्न होवुन यात विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.

त्यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत , नगर परिषद शाळा क्र. १ ते घोलकर घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या नियोजित जागेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती मधुन स्मारक करणे , भवानी रोड आशिर्वाद लॉज जवळुन भवानी कुंडास कायमचा रस्ता करणे , जिल्हा वार्षिक योजना ( अजाघका ) , मा.स्थानिक आमदार निधी , महाराष्ट्र नगरोत्थान / नागरी दलित्तेतर / वैशिष्टयपुर्ण निधी , इ . मधुन विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत त्यास मंजुरी देण्यात आली तसेच  . ईदगाह मैदान येथे काँक्रीट नाली करणे इ . नियोजित विकास कामांना मंजुरी देण्यात आली पुर्वीपासून तुळजापूर शहरातील वस्त्या व रस्त्यांना जातीवाचक नावे देण्यात आलेली होती. ही नावे बदलून या वस्ती व रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . तुळजापूर शहरामध्ये राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे राष्ट्रमाता जिजामाता यांचा पुतळा बसविण्यास मान्यता देण्यात आली . सर्वे नं २१५ वेताळनगर येथे संत सेना महाराज समाज मंदिर बांधण्यास मान्यता देण्यात आली . स्वच्छ माझे कार्यालय अंतर्गत ऐतिहासिक सुशोभिकरण करण्यास शासनाच्या योजनेमधुन खर्च करण्यास मान्यता देण्यात आली तसेच शहरातील न.प. च्या सर्व शाळा आदर्श मॉडेल करण्यास मान्यता देण्यात आली . ९ सप्टेबर रोजी घेण्यात येणारी सभा तहकुब झाल्याने ती आज संपन्न झाली  

सभेस यावेळी श्री किशोर साठे , श्री कंदले राजेंद्र , सौ हेमा कदम , सौ देशमाने मंजुषा , विविध समित्याचे सभापती व उपसभापती ,  पंडित जगदाळे , सौ वैशाली कदम , सौ शारद भोसले , श्रीम . भारती गवळी , सौ . आश्वीनी रोचकरी इ . सन्माननिय सदस्य उपस्थित होते .

 
Top