उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयामध्ये हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण अंतर्गत 27 ते 30  सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण मोहिम निवडलेल्या 30 शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येणार आहे.

 उस्मानाबाद जिल्हयामध्ये 2005 ते 2016 या कालावधीमध्ये एक दिवशीय सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्याम आली होती. या मोहीममध्ये दोन वर्षावरील बालकांना आणि सर्वाना डीईसी गोळया प्रत्येक वर्षी खाऊ घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे हत्तीरोग प्रमाण उस्मानाबाद जिल्हयामध्ये खूप माठया प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येते.

 या मोहीममध्ये एम एफ रेट हा एक पेक्षा कमी आल्यामुळे ही मोहीम बंद करुन टास सर्वेक्षण 2017 व 2019 मध्ये 6 ते 7 वयोगटातील मुलांची एफटीएस किट द्वारे रक्ताची तपासणी राबविण्यात आलेली आहे.

 तथापि, हत्तीरोगाचे प्रमाण समाजामध्ये किती प्रमाणात आहे. याबाबतची तपासणी रॅडम पध्दतीने निवडलेल्या गावांमण्ये एफटीएस किट दृारे 30 सप्टेबंर 2021 पर्यंत करण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

 कम्युनीटी टास सर्वेक्षण तीन ची मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरावर 22 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा स्तरीय समन्वय समिती , तालुका आरोग्य अधिकारी सर्व यांची बैठक आणि टीम मधील वैद्यकीय अधिकारी, प्रयोग शाळा वैज्ञानिक आधिकारी ,टीम मधिल सदस्य यांचे 1 दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.

 उस्मानाबाद जिलहयात या कम्युनीटी टास सर्वेक्षण निवडलेल्या 30 गावांमध्यो 9 टीमद्वारे आरोग्य पथकामार्फत 6 ते 7 वर्ष वयोगटातील मुलांची रक्ताची तपासणी एफटीएस किटद्वारे करण्यात येणार आहे. या मोहीममध्ये निवडलेल्या गावांमधील सर्व मुलांची तपासणी करण्यात बाबत आणि टीम मधील आरोग्य पथकास सहकार्य करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.


 
Top