परंडा / प्रतिनिधी :- 

 कायद्याचा चांगला अनुभव असल्याने अॅड. स्मिता गंगावणे ( सोनवणे ) यांची महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पॅनलवर उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात नुकतीच निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे . 

ॲड .स्मिता गंगावणे ( सोनवणे ) ह्या परंडा येथील जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांच्या कन्या असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परंडा येथे झाले असून रा. गे . शिंदे महाविद्यालयातून बी .ए . ची पदवी संपादन केली . रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथे कायद्याची पदवी ( एल .एल . बी ) प्रथम श्रेणीत उतीर्ण होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे वूमेन्स क्रिमिनल लॉ यावर आठरा राष्ट्रातील महिलांच्या गुन्हेगारीवरती अभ्यासपूर्ण व विद्यापिठात “ वूमेन्स क्रिमिनल लॉ “ प्रबंध सादर करून “ एल .एल .एम .”ही मास्टर पदवी मिळवल्याने त्यांचे शाळा , महाविद्यालयात सत्कार करण्यात आले , सर्वत्र कौतुक करण्यात आले .

 
Top