उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार केवळ एका वैद्यकीय अधिकार्‍यावर व अत्यंत कमी कर्मचार्‍यांवर सुरू आहे. याचा आरोग्य विषयक, प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे आणखी एका वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित राठोड यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे केली आहे.

मागील सात महिन्यांपूर्वी कोरोना काळात बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी यांच्यावर तालुका आरोग्य अधिकारी पदाची सूत्रे देण्यात आली. त्यामुळे दोनपैकी केवळ एका वैद्यकीय अधिकार्‍यावरच आरोग्य व प्रशासकीय विषयक कामकाजाचा ताण पडला आहे. न्यायालयात साक्षीसाठी जाणे, कार्यालयीन व्यवस्थापन, आरोग्यविषयक कामकाजाचे व्यवस्थापन, रूग्णसेवा, पोलीस कारवायांशी संबंधीत तपासण्या व उपचार अशा विविध महत्वाच्या कामांचा डॉ. राठोड व कार्यरत असलेल्या सहकारी कर्मचार्‍यांवर ताण पडत आहे. कमी आरोग्य कर्मचारी, एकच वैद्यकीय अधिकारी यामुळे रूग्णसेवेवरही मोठा परिणाम होत आहे.

 
Top