परंडा / प्रतिनिधी : - 

संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दि.४ रोजी येथील विठ्ठल मंदीर, कुराड गल्ली येथे नाभिक समाजाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. यंदाही कोरोनाच्या नियमांचे पालन करीत पुण्यतिथीनिमित्त भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.इतर सर्व धार्मिक कार्यक्रम टाळण्यात आले. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन नाभिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नागेश काशीद यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी १२ वाजता संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पवृष्टी करण्यात आली.

 यावेळी नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रितम डाके,नागेश यादव,नागेश डाके,प्रकाशकाशीद,संतोष भालेकर,किर्तनकार गायक विजय खंडागळे,योगेश खंडागळे,नितीन डाके,रमेश डाके,सचिन भालेकर,ओकांर काशीद,दत्ता डाके,संतोष डाके,दिपक डाके,अनिल डाके,संजय डाके,सुयोग्य यादव,सुरज काळे,बापुराव डाके,वसंत दळवी, दिपक डाके,गणेश डाके आदिंसह नाभिक समाज बांधव,महिलांची उपस्थिती होती.


 
Top