तेर / प्रतिनिधी

 कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हात  मुसळधार पाऊस पडल्याने जनजिवन विस्कळीत होऊन प्रचंड हानी झालेली असल्याने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तेरमध्ये मदतफेरी काढण्यात आली.या  मदतफेरीत 22हजार रूपये जमा झाले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रामसेवा संघ, शिवछत्रपती तालिम संघ व अमृततुल्य परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने मदतफेरी काढण्यात आली.मदतफेरीत 22 हजार रूपये जमा झाले.या मदतफेरीत अॅड.बालाजी भक्ते,सरपंच नवनाथ नाईकवाडी, बालाजी बनकर, तानाजी पिंपळे, नवनाथ पांचाळ, नरहरी बडवे, गोपाळ थोडसरे, सिद्धार्थ कसबे, माधव मगर,विजय थोडसरे,संजय जाधव, सारंग पिंपळे,केशव सलगर,पवन माने, गणेश भक्ते, सोमनाथ माने, खंडू गायके,ललित बंडे, नागेश ठोंबरे,हरी भक्ते, शामराव गायके आदी सहभागी झाले होते.


 
Top