उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 लोहारा तालुक्यातील दस्तापूरचे पोलिस पाटील सुधाकर दत्तू गायकवाड यांनी पोलीस चौकी येणेगूर येथे येवून माहिती दिली की, दिनांक 12 जुलै 2021 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ते गावात असताना गावातील लोकांकडून माहित झाले की, मौ.दस्तापूर शिवारातील सतीश गंगणे यांच्या शेताजवळ एन.एच. 65 रोडच्या कडेला एक अनोळखी वेडसर व्यक्ती वय अंदाजे 60 वर्ष हा मयत अवस्थेत पडलेला आहे.

हा अनोळखी वेडसर व्यक्ती मागील दोन-तीन दिवसांपासून एन.एच.65 रोडने दस्तापूर येथे फिरत होता. दिनांक 11 जुलै 2021 रोजी त्या अनोळखी वेडसर व्यक्तीस आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला असता तो काही एक बोलला नाही. हा वेडसर व्यक्ती आजारी असल्यासारखे वाटत होते व तो जेवण न केल्यामुळे अशक्त झाला होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. या मयत व्यक्तीबाबत माझा कोणावर संशय किंवा तक्रार नाही तरी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारची नोंद  मुरुम येथील पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.


 
Top