उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील कार्यादेश दिलेल्या रस्त्याची कामे अर्धवट असुन त्या रस्त्यावरुन जाताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, परंतू सामाजिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या होणाऱ्या समस्यांकडे लक्ष देऊन शहरातील कार्यादेश दिलेल्या रस्त्याची कामे लवकरात लवकर पुर्ण करा, अशा मागणीचे निवेदन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियता सगर यांना फुक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, शहरातील  छत्रपती संभाजीराजे मार्ग,काकडे प्लाॅट,सांजा रोडवरील टि पाॅईण्ट पुलाचे काम,अन्य इतर ठिकाणच्या कामाला विलंब होत असुन वर्षभरात ओबडधोबड मुरुम टाकुन केलेल्या काम,डांबरीकरण अशातुन कामे प्रलंबित असुन हि कामे लवकरात लवकर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देते समयी  धर्मवीर कदम,मुकेश नायगावकर,गणेश रानबा वाघमारे आदींची उपस्थिती होती. 


 
Top