तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यात पहिल्या व दुसऱ्या टप्यात आज पर्यत तीस हजार आठशे  सोळा जणांची कोविड १९ची  तपासणी केली असता यात  ३८३९ जण कोरोना पाँजीटीव्ह आढळले तर २६९७७ जण निगेटीव्ह आढळले. आज पर्यत १४३ जण कोरोना ने मुत्युमुखी पडले असुन  मुत्यु दर ३.७० आहे. रिकवरी दर ९१ टक्के आहे.

आजपर्यत १८१३७जणांचा आरटीपीसीआर टेस्ट केल्या असता यात २०१३जण पाँजीटीव्ह आले. तर १२६७९जणांची अंटीजेन टेस्ट केली असता यात १८२६पाँजीटीव्ह आले . एकुण ३०८१६ जणांचा कोविड तपासणी केल्या असता त्यात ३८३९कोविड पाँजीटीव्ह आढळले तर २६९७७जणांची कोविड टेस्ट निगेटीव्ह   आली.यात ऐकुण १४३ जण कोविड ने मुत्युमुखी पडले आजपर्यत ३८३९ कोविड पाँजीटीव्ह पैकी ३४९६ कोविड रुग्ण उपचार घेवुन बरे घरी गेले .

कोविड पाँजीटीव्ह रेट १२ टक्के असुन मुत्युदर ३.७० टक्के आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के आहे. तुळजापूर येथे उपजिल्हारुग्णालयात तुळजापूर व लोहारा तालुक्यातील कोविड रुग्णावर उपचार केला जात असुन येथे १०० आँक्सीजन बेडचे कोविड रुग्णालय आहे. येथे नगरपरिषद मालकीचे आठवडा परिसरातील १२४ रुम असलेल्या रेस्ट हाऊस येथे कोरोना सेंटर असुन येथेही १४५आँक्सीजन बेडचे कोविड सेंटर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने कार्यान्वित केले आहे.येथे कोविड व क्वारटाईन मंडळी वास्तव्य करीत आहेत. तसेच कोरोच्या पहिला टप्यात श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मालकीचे असलेले घाटशिळ रोड येथील १०८ रुम विश्रामधाम येथे कोरोना सेंटर सुरु केले होते.

 
Top