तुळजापूर / प्रतिनिधी -
तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत हुतात्मा स्मारक आर्य चौक, किसान चौक रस्ता रुंदी करण काम मंजुर झाले असुन ते तात्काळ सुरु करण्याची मागणी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष लखन पेंदे यांनी श्री तुळजापूर विकास प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवुन केले आहे.
निवेदनात म्हटलं आहे की, हा रस्ता रहदारीचा व सर्वाधिक वर्दळीचा असुन येथे भाविकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असते सध्या हा रस्ता अरुंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने हे काम तात्काळ सुरु करण्याची मागणीचे निवेदन लखन पेंदे ,आनंद जगताप, नगरसेवक रणजित इंगळे यांनी दिले