उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच ऑक्सिजन (प्राणवायू) पुरवठा  वेळेवर होत नसल्यामुळे अनेक रूग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे उस्मानाबादचे तहसीलदार माळी यांच्या सुचनेनुसार रूपामाता नॅचरल शुगर लि. कारखाण्याचेे चेअरमन तथा रूपामाता उद्योग समुहाचे अॅड. व्यंकट विश्वनाथराव गुंड  यांच्या तर्फे ५ ऑक्सिजन सिलेंडर मंडळ अधिकारी श्री.कोळी, तलाठी  लाकाळ यांच्या मार्फत सिव्हील हॉस्पीटल उस्मानाबाद  यांच्याकडे सुर्पूद केले. 

गेल्या वर्षी ही  लॉकडाऊनच्या काळात 6 महिने गरजुवंताला अन्नदान तसेच पुर्व जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनसाठी भोजनाचा सोय केली होती. तसेच अनेक सामाजिक उपक्रम ही राबविले होते. ही सामाजिक बांधिलकीची परंपरा रूपामाता वेळोवेळी जपत असल्याचे पहावयास मिळते.

 
Top