उस्मानाबाद /प्रतिनिधी -

उस्मानाबादच्या स्मशानभूमीत आज कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळाले आहे. बुधवारी एकाचवेळी  १९ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, हे चित्र पाहून स्मशानभूमी देखील गहिवरली असेल! असचं हे चित्र होत. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत बुधवारी १९ मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे ८ मृतदेहांवर आज गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. उस्मानाबादचे हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले.

 
Top