परंडा / प्रतिनिधी : -

संपूर्ण देशात कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव खुप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे यामुळे शाळा,कॉलेज,कोचिंग क्लासेस बंद असल्या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा खुप मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे या आणुशंगाने तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दि.6 मंगळवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

यावेळी देवस्थान विश्वस्त चंद्रकांतपुजारी,सुभाषसिंह सद्दीवाल, सरपंच दिपक दुबळे,ग्रामपंचायत सदस्य, भाविक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदानास सुरूवात करण्यात आली.अॅड प्रसाद जोशी,सरपंच दिपक दुबळे,समीर पुजारी,साधना पुजारी,सलीम तांबोळी,हुसेन शेख यांच्यासह अनेक महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर रक्तदानास सहभाग नोंदवला.

रक्तदान शिबिरास ग्रामस्थांसह, भाविक भक्तांनी देखील सहभाग नोंदवत ५१ एकावण्ण रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान करताना कोरोना नियमावलींचे पालण करण्यात आले.रक्तदात्यास श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट मार्फत शाल श्रीफळ,श्रींची प्रतिमा,सॅनीटायझर बाटली,मास्क,भेटवस्तू व चहाबिस्कीट प्रमाणपत्र आंभी पोलीस निरीक्षक खांडेकर , कॉन्स्टेबल गजानन मुळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवर अंगद फरतडे, राम पाटील,गिरीश कुलकर्णी,ईश्वर मोरे,रवि मांडवे,अविनाश ईटकर,गोकुळ ईटकर,सलीम तांबोळी,हुसेन शेख आदी उपस्थित होते. चैत्र महिन्यात होणारा नाथांचा याञा उत्सव यावर्षी देखील कोरोनाच्या महामारीमुळे रद्द करण्यात आलेला आहे.अशी सुचना भाविक भक्तांना देण्यात आली.भाविकांनी आपल्या कुटुंबासमवेत  घरीच राहुन नाथांची पुजा करावी.कोरोणा नियमांचे पालन करून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन भक्तांना केले आहे.


 
Top