तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर  येथील  श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरात शुक्रवार दि.२ रोजी सकाळी श्रीतुळजाभवानी मातेस रंग लावून रंगपंचमी पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात आली.

 शुक्रवारी सकाळी श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक  करण्यात आल्यानंतर देवीजीस वस्ञोलंकार घालण्यात आले .नंतर आरती करण्यात आली नंतर  भक्तांनी व पुजारीवृदांनी आणलेला सप्तरंग  श्रीतुळजाभवानी मातेच्या मुखास  देविचे मंहत तुकोजीबुवा  व मंहत हमरोजी बुवा  आजचा पाळीचे पुजारी अतुल मलबा यांनी सप्तरंग लावला नंतर  वस्ञावर रंग शिपडण्य   आल्यानंतर देविचा अंगारा काढण्यात आला.

 सकाळी बच्चेकंपनीने कोरडा व पाण्यातुन रंग खेळला आज देविदर्शनार्थ आलेल्या भक्तांनीही कोरडा रंग लावुन रंगपंचमी देवीदारी साजरी केली. कोरोना पार्श्वभूमीवर रंगपंचमी उत्सव कुणीही साजरा केला नाही.

 
Top