उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल येथील पत्रकार मल्लीकार्जुन सोनवणे यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्त संपादक धनंजय रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उस्मानाबाद येथील पिताश्री श्रीमंतराव रणदिवे कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी (दि.१२) हा सत्कार समारंभ पार पडला. फेटा, बुके देवून व पेढा भरवून श्री. सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे सहसचिव राजाभाऊ वैद्य, जिल्हा संघटक प्रशांत कावरे, दत्ता शिंदे, विनोद बाकले, संतोष शेटे, बालाजी साळुंके, संतोष जोशी, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते.


 
Top