परंडा / प्रतिनिधी -

परंडा तालुक्यातील शेळगांव येथे सरपंच सुलोचना शेवाळे, ग्राम सेवक युवराज भोसले, पंचायत समिती सभापती अनुजा दैन, शेळगांव शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ दैन, भोसलेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक वैजीनाथ सावंत, तसेच शेळगाव ग्रामपंचायतचे लिपिक बाबुराव दैन, आशा कार्यकर्ती मंगल देवकर, नयना शेवाळे, माधुरी सुतार, सोनाली देवरे यांचे उपस्थितीत “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या शासन निर्देशानुसार दि.२३ एप्रिल रोजी बैठक घेण्यात आली.या बैठकीत शेळगाव आणि शेळगाव ग्रामपंचायत अंतर्गत भोसलेवस्ती, काळेवाडी,लोणारवाडी,शेवाळे नगर,माणिकनगर या भागातील कुटुंबाचा सर्वे करून जास्तीत जास्त लवकर सर्वेक्षण पूर्ण करण्याचे दृष्टीने नियोजन करण्यात आले.  

 “माझं गाव कोरोनामुक्त गाव”या मोहिमेस अनुसरून शेळगाव व शेळगाव परिसरात कुटुंबाचे घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुख व सर्व सदस्य यांचे तापमान,-हदयाचे ठोके, ऑक्सिजन लेवल, यांची तपासणी करून, कुटुंबात कोणी आजारी आहे का याची खात्री केली, तसेच मास्क वापरावर भर देऊन,कामा शिवाय घराबाहेर पडू नये,व आजार अंगावर काढू नये,लस टोचून घ्यावी अशा सुचना दिल्या.

खबरदारी हीच आपली सर्वांची जबाबदारी आहे.भोसलेवस्ती भागात सर्वेक्षण करताना १०२ वर्ष वयाचे आजोबा रामहरी शेवाळे यांची ऑक्सिजन लेवल, तापमान आणि -हदयाचे ठोके अगदी लेवल मध्ये असून प्रकृती ठणठणीत दिसून आली,दात तर एकही पडलेला नसून बसल्या बसल्या चिंचा सोलायचं काम करताना दिसले.शेळगाव व शेळगाव परिसरात कुटुंब सर्वेक्षणाचे काम जवळपास  ८० टक्के पूर्ण झालेआहे.अशी माहिती मुख्याध्यापक वैजीनाथ सावंत यांनी दिली.

 
Top