उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सदर आरोपीला नगर जिल्ह्यातल्या खडकवाडी परिसरातून शिताफीने पकडण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, शिराढोण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुल्या विठ्ठल काळे उर्फ सोन्या( रा. खडकवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याचा पोलीस वर्षांपासून शोध घेत होते. त्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि पांडुरंग माने, पोना दीपक लाव्हरे पाटील, अमोल चव्हाण, पोकॉ अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, आरसेवाड यांच्या पथकाने गुरूवारी शिताफीने व सापळा रचून खडकवाडी परिसरातून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शिराढोण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 
Top