तुळजापूर / प्रतिनिधी- 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावरती अन्याय कारक शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करा या मागणी साठी  तुळजापूर शहर बंद करून धरणे अंदोलन करण्याचे ठरले होते. परंतु कोरोना मुळे बंद मुळे त्रस्त व्यापारी वर्ग तथा भावीक भक्तांच्या आडचणी लक्ष्यात घेऊन तथा प्रशासनाच्या विनंती वरून बंद व धरणे अंदोलन रद्द करत फक्त मा. तहसीलदार साहेबांना काळे कायदे रद्द करा या अशयाचे निवेदन देण्यात आले.

या  वेळी तालुका अध्यक्ष अमर भय्या मगर, सेवादलाचे तालुका अध्यक्ष तानाजी जाधव, तुळजापूर विधान सभा मतदार संघ निरीक्षक विकास तांबे, लखन पेंदे, नगर सेवक रणजितबाबु इंगळे,यूवक काँग्रेसचे शहरचे अध्यक्ष लखन पेंदे,चंद्रकांत लबडे,पं स माजी सभापती शिवाजी गायकवाड,हरीभाऊ मचाले,मेटे महाराज आदी  उपस्थितीत होते.


 
Top