परंडा / प्रतिनिधी :-

गोपनीय अहवालाची झेरॉक्स प्रत प्रतीवर्षी संबंधित कर्मचा-यांना देण्यात यावी असे शिक्षणाधिकारी (प्रा.)यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना लेखी पत्राद्वारे अवगत करून ही अंमलबजावणी होत नसल्याने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती परंडा अनिता जगदाळे यांना शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

 गट शिक्षण कार्यालयाचे अधिनस्त कार्यरत प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, प्राथ.पदवीधर, केंद्र प्रमुख यांचे गोपनीय अहवाल पुनर्विलोकन करून त्याची एक छायांकीत प्रत संबंधित कर्मचा-यांनादेण्यात यावी. याबाबतशिक्षणाधिकारी(प्रा.)जि.प.उस्मानाबाद यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना

दि.६/१०/२०२० रोजी लेखी पत्राद्वारे कळविले होते.तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही संबंधित कर्मचा-यांना गोपनीय अहवाल प्रतीवेदन व पुनर्विलोकन करून त्याची एक झेरॉक्स प्रत दिलेली नाही, तरी  तातडीने संबंधित कर्मचाऱ्यां - ना गोपनीय अहवालाची झेरॉक्स प्रत देण्यासाठी उचित कार्यवाही करावी.अन्यथा आपल्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. वैयक्तिक समुह अपघात विमा योजने अंतर्गत वार्षिक वर्गणी ३५४/- रुपये संबंधित कर्मचा-यांने भरून दिलेल्या नामनिर्देशन व अनुमती पत्रानुसार दरवर्षी माहे फेब्रुवारी च्या  वेतनातून कपात होत आहे.समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ म्हणून अपघाती मृत्यू झालेस १० लाख विमा संरक्षण आहे. रुपये ३५४ चा अपघात विमा योजनेची नोंद मुळ सेवा पुस्तिकेत  घेण्यात यावी अशी संघटनेची आग्रही भूमिका आहे,सेवा पुस्तिकेत नोंदी न घेतल्याने सदरिल कर्मचा-यास अपघात विमा योजनेचा क्लेम लागू न झालेस व त्यांचे वारस लाभा पासून वंचित राहिल्यास गटशिक्षणाधिकारी हे यास सर्वस्वी जबाबदार राहतील.या बाबी निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत.

यावेळी कार्यालयीन विस्तार अधिकारी सतिश संगमनेरकर, प्रहार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top