उस्मानाबाद/ प्रतिनिधी;

 उस्मानाबाद येथे सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  तसेच जयंतीनिमित्त देवकते गल्ली व नजीकच्या  परिसरातील रहिवाशी व ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत ऑनलाइन कोरोना लसिकरण नाव नोंदनी व लसीकरणासाठी जाण्या-येण्यासाठी मोफत रिक्षासेवेचे आयोजन केले.

यावेळी प्रा. लांडगे यांनी मल्हारराव होळकर यांनी कठीण परिश्रम करून होळकर शाही प्रस्थापित केली व मराठ्याच्या राज्याची सीमा सिंधु नदीपर्यंत तसेच कटक पासून अटक पर्यंत राज्याचा    विस्तार केला. तसेच अहिल्यादेवी सारख्या कर्तबगार राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या जडण घडण करण्यात मोठा  वाटा आहे असे गौरवोद्गार काढले. यावेळीनगरसेवक बाळासाहेब काकडे,  अग्निवेश(भैय्या)शिंदे, प्रा.मनोज डोलारे, राहुल काकडे, रवी (भैय्या) वाघमारे, इंद्रजित देवकते, आण्णा बंडगर, मेजर अशोक गाडेकर, मंगेश (भैय्या) देवकते, अशोक सोलंकर, संतोष देवकते, रामेश्वर देवकते

तसेच कार्यक्रमाचे आयोजक नरसिंह मेटकरी, रवी देवकते, अमित देवकते, ओंकार देवकते, संदीप देवकते, रोहन महानवर, हर्षद ठवरे, सौरभ देवकते, अरविंद देवकते, कुणाल महानवर, व देवकते गल्ली येथील नागरिक  करोना नियमाचे पालन करून उपस्थित होते.

 
Top