उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती व जमाती सेलच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी संजय वसंतराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते संजय पाटील यांनी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मसूद शेख, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, कादरखान पठाण, उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज बबलू शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, रणधीर इंगळे, अमोल सुरवसे , महेश नलावडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top