परंडा / प्रतिनिधी -

परंडा पोलिस ठाण्यात जप्त असलेल्या बेवारस मोटार सायकल मालकांनी मोटार सायकल ची ओळख पटऊन दोन महिण्यात घेऊन जावे मुदतीत मालक पुढे न आल्यास  लिलाव करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या जाहिरनामा द्वारे कळविले आहे.

 परंडा पोलिसांनी जप्त केलेल्या ६७ बेवारस  मोटार सायकल गेल्या अनेक वर्षा पासुन पडून आहेत मात्र मोटार सायकल घेऊन जाण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आले नसल्याने परंडा पोलिसांनी  मोटार सायकल घेऊन जाण्यासाठी अवाहन केले आहे. या बेवासस मोटार सायकल मालकाचा शोध घेण्या - साठी  परंडा पोलिसांनी उस्मानाबादच्या आर.टी. ओ.कार्यालयात मोटार सायकलचा नंबर इंजिन व चेशी नंबर पाठऊन  मालकाचा तपशील देण्यासाठी  विनंती केली मात्र १ महिन्या नंतर देखील तपशील प्राप्त झाला नसल्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ज्यांची मोटार सायकल आहे त्यांनी घेऊन जाण्याचे अवाहन संबंधीतांना केले आहे.

दोन महिण्यात मोटार सायकलचे मालक पुढे न आल्यास दोन महिन्या नंतर जाहिर लिलाव करुन  रक्कम शासनास भरण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या जाहिरनामा पत्रकात म्हटले आहे.

 
Top