तुळजापूर / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथील सुपुत्र तथा मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार व त्यांचे बंधू बालाजी पवार यांचा वतीने अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनासाठी संत - महंतांच्या उपस्थितीत प्रत्येकी ५१ हजार रुपये निधीचे धनादेश हस्तांतरित करण्यात आला. दोघांनी एक लाख दोन हजार रुपयांचे दान दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तुषार चौधरी यांच्याकडे अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी तर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांच्याकडे प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी अरुण पवार, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे दहावे वंशज शिवाजीराव मोरे महाराज, आत्माराम महाराज शास्त्री, वाघ महाराज, वेदांतचार्य हरीभाऊ पालवे महाराज, शास्री महाराज, गजानन महाराज वाव्हळ, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष मारूती महाराज कोकाटे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजामगुंडे, भिष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण खडके, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण फिरके, नानासाहेब शितोळे महाराज, श्री गीता अध्यात्मिक आश्रम सत्संग मंडळ आळंदीचे वेदांतचार्य हरिभाऊ शास्त्री महाराज, देहूचे उपसरपंच संतोष हगवणे, सामाजिक कार्यकर्त्या आशा पवार, दिघीकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. उत्तम घुगे, दिव्यांग प्रतिष्ठानचे हरिश्चंद्र सरडे, उद्योजक चैतन्य पाटील, दत्तात्रय धोंडगे, कुमार लोमटे, राजुभाऊ मोरे, जेष्ठ नागरिक आणि मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत कुरुलकर यांनी, तर प्रकाश इंगोले यांनी आभार मानले.
घुगे, दिव्यांग प्रतिष्ठानचे हरिश्चंद्र सरडे, उद्योजक चैतन्य पाटील, दत्तात्रय धोंडगे, कुमार लोमटे, राजुभाऊ मोरे, जेष्ठ नागरिक आणि मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत कुरुलकर यांनी, तर प्रकाश इंगोले यांनी आभार मानले.