येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर, उस्मानाबाद यांच्या वतीने पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सेमिनार मध्ये बोलताना डाॅ.मंजुळाताई आदित्य पाटील यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात द्यायच्या JEE,NEET व स्पर्धा परिक्षांची तयारी शालेय पातळी पासूनच करणे गरजेचे आहे व त्यासाठी शालेय पातळीवर होणार्या स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे,असे मत व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या हस्ते प्रशालेतील विविध बाह्य स्पर्धा परिक्षेतील यश प्राप्त केलेल्या चि.वेदांत डोंगरे, कु.हर्षदा वरपे , चि .कुलजीत इंगळे, चि.आरूष जालन ,चि.योगिराज जहागिरदार चि.समर्थ पवार ,कु.देशमुख समृध्दी, कु. आकांक्षा बनकर या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. समिनार मध्ये उपस्थित पालकांना फ्लाईंग स्कूलचे प्राचार्य श्री. चतुर्वेदी सर यांनी ही मार्गदर्शन केले कार्यक्रमास , मुख्याध्यापक श्री. प्रदिपकुमार गोरे,श्री.बाळासाहेब देशमुख, समन्वयक श्री. किसन हजारे , श्री. राजेंद्र जाधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाह्य परीक्षा विभागाच्या श्रीमती माने मॅडम, श्रीमती. मिसाळ मॅडम यांनी काम केले तर कार्यक्रमाचे सुञसंचालन श्रीमती उटगे मॅडम यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती . तिकोणे मॅडम यांनी केले ..
