तुळजापूर / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतसाठी  सोमवारी झालेल्या मतमोजणीत प्रामुख्याने काँग्रेस व भाजपा प्रणित समर्थकांचा आघाडीत जोरदार लढत झाली  दोन्ही पक्षांचे  समर्थक  यात मोठ्या संखेने विजयी झाले 

अणदूर वगळता अनेक गावात प्रथापितांची सत्ता मतदारांनी उलथुन टाकली. अणदूरचा गड काँग्रेस चे माजीआ मधुकर चव्हाण यांनी राखला.   तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते माजीमंञीजीआ मधुकर राव चव्हाण यांनी आपल्या अणदूर गावात महाविकास आघाडीचे सतरा पैकी सतरा उमेदवार निवडुन आपले वर्चस्व कायम राखले.येथे काँग्रेस चे धनराज मुळे सरीता मोकाशे सेनेचे बाळकृष्ण पाटील हे महाविकास आघडीकडुन विजयी झाले .

तर जळकोट येथे गणेश सोनटक्के यांची वीस वर्षाची सत्ता जावुन तिथे काँग्रेस शिवसेना मनसे यांच्या महाविकास  आघाडीने बारा जागा जिंकुन   विजय संपादन केला 

येथे महाविकास आघाडीने आपले दिग्गज उमेदवार उभे केले होते.येथे गणेश सोनटके यांच्या आघाडीलापाच जागा मिळाल्या येथे मनसेचे जिल्हाअध्यक्ष प्रशांत नवगिरे विजयी झाले. तामलवाडी येथे ही सत्ता परिवर्तन होवुन सर्वधर्मसमभाव पँनलने आठ जागा जिंकुन विजय संपादन केला तर ऐकता पँनल ला तीन जागेवर समाधान मानावे लागले .मंगरुळ येथे अतीशय चुरशीची निवडणुक होवुन  ही सत्तांतर झाले यथे   कंचेश्वर परीवर्तन पँनलने सहा जागा जिंकुन विजय संपादन केला तर कंचेश्वर विधायक पँनल ला पाच जाग मिळाल्या .येथे अतिशय चुरशीची लढत झाली . 

इटकळ येथे भाजपाप्रणित आघाडीने  ९पैकी ९जागा जिंकुन विजय मिळवला ण्

सलगरा दि येथे काँग्रेस चे साधु मुळे यांच्या पँनलला पराभव स्विकारावा लागला येथे  आ राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले प्रशांत  लोमटे  प्रभाकर मुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने उभेशकेलेल्या  पँनलने आठ जागा जिंकुन सत्ता ताब्यात घेतली येथे साधु मुळे यांच्या पँनलला तीन जागा मिळाल्या .येथे काँग्रेस ची सत्ता खालसा झाली .

 सिंदफळ येथेही सत्तांतर झाले मुदगुलेश्वर पँनल ने अकरा पैकी दहा जागा जिंकुन विजय प्राप्त केला येथे ग्रामविकास पँनलला ऐक जागा मिळाली. शिराढोण येथे गणेशविकास पँनलला चार व शिराढोण विकास पँनलला तीन जागा मिळाल्या दिंडेगाव येथे नवलिंगेश्वर पँनलने सात पैकी  सहा जागेवर विजय मिळवला# या निवडणुकीत मतदारांनी मोठे बदल करून त्याच त्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवला


 
Top