कळंब / प्रतिनिधी-
न.प. च्या सर्वसाधारण बैठकीला शिवसेनेच्या नगरसेवकांनी दांडी मारली न. प. च्या सत्तधारी आम्हाला कसलाही विश्वासात घेउन निर्णय घेत नाही असा आरोप करून शिवसेनेने या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. झालेल्या मीटिंग मध्ये सर्व चोवीस ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
कळंब न.प.च्या विषयी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. सकाळी बारा वाजता बैठक होती, पण शिवसेनेचे गटनेते शिवाजी कापसे व सदस्यांनी सत्ताधारी हे मनमानी कारभार करत आहेत आम्हाला कुठल्याही निर्णयात विश्वासात घेतले जात नाही, तसेच शहरातील शॉपिंग सेंटरला नावे देण्यासाठी अनेक वेळा अर्ज देऊन ही , त्याची दखल घेतलेली नाही, सत्ताधारी मंडळी ही मनमानी कारभार करत आहे, असा आरोप करत या सभेवर बहिष्कार टाकला.
या चे निवेदन मा. मुख्याधिकारी यांना देण्यात आले, यावेळी या निवेदनावर शिवसेनेचे गटनेते शिवाजी कापसे, नगरसेवक मुस्ताक कुरेशी, अनंत वाघमारे, सतीश टोणगे, नगरसेविका सौ.सुरेखा राजेश पारख, सौ. अश्विनी सुरेश शिंदे, सौ.मीराताई चोंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.