उस्मानाबाद / प्रतिनिधी
१५ जानेवारी रोजी जिल्हयातील ३८२ ग्रामपंचायती मध्ये ११७२ प्रभागासाठी शांततेत मतदान झाले. गावस्तरावर ही निवडणुक असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी शक्यता आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २८.८० टक्के तर दुपारी दीड वाजेपर्यंत ४९.९ टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी ५.३० पर्यंत ६५ ते ७० टक्क्याच्या जवळपास मतदान होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ७० ते ७५ टक्के जिल्हयात मतदान होणेचा प्राथमिक अंदाजा आहे.
मतदानाची वेळ ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्हयात दुपारी साडेतीन पर्यंत ६७ टक्के मतदान झाले होते.
उस्मानाबाद तालुक्यात ६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. दुपारी दीड पर्यंत ४८.४२ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५.३० पर्यंत ७२ टक्के मतदान झाले. तुळजापूर तालुक्यात ४८ ग्रामपंचायतीसाठी दुपारी दीड पर्यंत ५२.६१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५.३० पर्यंत ७० ते ७५ टक्के मतदान झाले. उमरगा तालुक्यात ३८ ग्रामपंचायतीसाठी दुपारी दीड पर्यंत ५१.२२ टक्के मतदान झाले तर सायंकाळी ७० ते ७५ टक्के मतदान झाले. लोहारा तालुक्यात २१ ग्रामपंचायतीसाठी ५१.७४ टक्के दुपारी दीड पर्यंत मतदान झाले. तर सायंकाळी ५.३० वाजता ७० ते ७५ टक्के मतदान झाले. कळंब तालुक्यात ५३ ग्रामपंचायतीसाठी दीड वाजेपर्यंत ४५.९१ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५.३० पर्यंत ७० ते ७५ टक्के मतदान झाले. वाशी तालुक्यात ३३ ग्रामपंचायतीसाठी दुपारी दीड पर्यंत ४२. ४५ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५.३० पर्यंत ७० ते ७५ टक्के मतदान झाले. भूम तालुक्यात ६१ ग्रामपंचायतीसाठी दुपारी दीड पर्यंत ४८.५७ टक्के मतदान झाले.तर सांयकाळी ५.३० वाजेपर्यंत ७० ते ७५ टक्के मतदान झाले. परंडा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीमध्ये दुपारी दीड पर्यंत ५१.०८ टक्के मतदान झाले. तर सांयकाळी ५.३० वाजेपर्यंत ७० ते ७५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाजाचा आहे. निवडणुक विभागातर्फे अधिकृत माहिती मिळण्यास उशीर असल्याचे सांगण्यात आले.
