उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट केल्याची अनेक प्रकरणे आपल्या निदर्शनास येतात. मात्र अशा लाचखोरीला आळा बसण्यासाठी लोकसेवकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल करा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी केले.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी शुक्रवारी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत संपते व त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक खाडे म्हणाले की, कोणत्याही शासकीय कार्यालय अथवा आस्थापनेतील लोकसेवक लाच घेत असेल तर त्याची तक्रार करणे आधुनिक काळात सोपे झाले आहे. कार्यालयाच्या फोनवर, व्हॉट्सअपवर, संकेतस्थळावर अथवा ई-मेलवरही तक्रार दाखल करता येते. तक्रार प्राप्त होताच, लोकसेवकावर कारवाईसाठी एसीबीच्या पथकाकडून सापळा लावला जातो. लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या आरोपीवर कडक कारवाई होवून लाचखोरीला आळा बसण्यासाठी पथक परिश्रम घेते. कोरोना काळात अनेक ठिकाणी आर्थिक लूट होताना निदर्शनास आले, मात्र नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या नाहीत.

 
Top