परंडा तालुक्यातील भोंजा हवेली येथील शेतकऱ्यांना हरभरा (राजविजय) महाबीज बियाणे कृषी विभाग अंतर्गत दि.५ गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता शेतकरी समक्ष लकी ड्रॉ पद्धतीने हरभरा बियाणे २० किलो प्रती बॅग अशा २५ बॅग हरभरा बियाणे शेतकरी यांना वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी सहाय्यक पी.पी.सरडे यांनी कृषी विभाग व आत्मा विभाग हे शेतकरी यांच्या कामकाजात कायमच तत्पर असतात शेतकऱ्याच्या वेळोवेळी समस्या जाणून घेऊन शेतकरी यांना तात्काळ दिलासा देण्याचा प्रयत्न करतात या कामी कृषी विभाग परंडा अव्वल आहे.
यावेळी उपस्थित सरपंच राम नेटके, कृषी सहाय्यक पी.पी.सरडे, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रदिप नेटके, विनोद कोळी, हंबीराव भांदुर्गे, बळीराम मोरे, अशोक नेटके, जगन्नाथ भादुर्गे, भिमराव नेटके, नवनाथ घाडगे, बाबुराव टमटमे, पंडित गुडंगीरे, सदाशिव भादुर्गे, बापु सरवदे, जिवन मोरे, सत्यवान मोरे, सोमनाथ जाधव, बाबासाहेब घाडगे, प्रल्हाद नेटके, किसन नेटके, बबन भादुर्गे, रविंद्र सरवदे, आनंद कणसे इ मोठ्या संख्येने शेतकरी बंधू उपस्थित होते.
