तेर / प्रतिनिधी  

 तेर येथील श्री सत गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरांच्या पश्चिम बाजूकडील भिंतीच्या निकृष्ट बांधकामामुळे  तळमजल्यावर असलेल्या दर्शन बारी गाभाऱ्यात गुडघाभर पाणी साचले असून मूळ मंदीर असलेल्या संत गोरोबा काका समाधी मंदीर व  कालेश्वर मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता  आहे .

 गोरोबा काका समाधी मंदिराचा विकास होऊन गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून भावीकासह नागरीकातून अनेक वर्षांपासून मागणी होत होती त्यामुळे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून जिल्हा  परिषद बांधकाम विभागाच्या वतीने  2012 मध्ये मंदिर विकासाचे काम हाती घेण्यात आले   पश्चिम बाजुकडील भिंतीसाठी 1 कोटी  20 लाख रुपये निधी  उपलब्ध झाल्यानंतर गोरोबा काका समाधी मंदिराच्या पश्चिम बाजुकडील भिंतीचे बांधकाम सन 2015-16 मध्ये पूर्ण करण्यात आले त्यामुळे गोरोबा काका समाधी मंदिराच्या सौंदर्यात भर पडल्याने  भावीकासह नागरीकात समाधान व्यक्त केले जात होते 

 गत दहा ते पंधरा दिवसापुर्वी पडलेल्या  पावसामुळे तेरणा नदीसह तेरणा मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहत असल्याने  गोरोबा काका मंदिराजवळ अवघ्या वीस फुटांवर असलेले तेरणा नदीचे पात्रही दुथडी भरून  वाहून गेले   श्री संत गोरोबा काका समाधी मदिराच्या पश्चिम बाजूच्या भिंतीला गळती लागून दर्शन रांगेतील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे विशेष म्हणजे गोरोबा काका समाधी मदिराच्या व भगवान कालेश्वर मंदिराच्या पायामध्ये हे पाणी मुरत आहे. त्यामुळे भविष्यात संत परीक्षक असलेल्या संत गोरोबाकाकाच्या 700 वर्षांपूर्वी च्या समाधी मंदिरास व दोन हजार वर्षाचा इतिहास असलेले भगवान कालेश्वर मंदिर या दोन  पुरातन मंदिरांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही

भिंतीच्या बांधकामास चार वर्षां  पूर्ण होत नाही तोपर्यंतच कोट्यावधीचा चुराडा करून बांधलेल्या पश्चिम बाजुकडील भिंतीचे बाधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने भिंतीला गळती लागून मोठया प्रमाणात पाणी साचले त्यामुळे 1 कोटी  20 लाख रूपये पाण्यात गेले आहे. गोरोबा काका समाधी मंदिराच्या पश्चिम बाजूकडील भिंतीच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित गुतेदारासह अधिकाऱ्यावर कार्यवाही करुन दोन पुरातन मंदिरे जतन करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा विचार करून  भविष्यात मंदिराला होणारा धोका टाळावा अशी मागणी भावीकासह नागरीकातून होत आहे

 
Top