वाशी / प्रतिनिधी

ग्रामीण रूग्णालय वाशी येथे आयुष विभागामार्फत आयुर्वेद फाॅर कोव्हिड 19 महामारी या मुख्य विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करुन उपस्थित जन समुदायास मार्गदर्शन करण्यात आले.   या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून  सेवानिवृत्त उपायुक्त   श्री.सुभाष मोळवणे साहेब,यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.नितीन चेडे माजी नगराध्यक्ष वाशी तसेच मार्गदर्शक मा.वै.अधिक्षक डॉ.कपीलदेव पाटील सर,आयुष वै.अधिकारी डॉ. संजीव गरड आयुर्वेद तज्ञ, डॉ. हिराळे होमियोपॅथी तज्ञ तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर तानवडे व वाशी शहरातील आयुर्वेदाचार्य डॉ. सचिन पत्की,डॉ. किशोर जाधव,डॉ. राहुल बाराते डॉ. नितीन भराटे व ग्रा रू तील वैद्यकीय अधिकारी डॉ. महावीर कोटेचा सर व ICTC समुपदेशक तुंदारे परमेश्वर व NCD समुपदेशक उबाळे उत्तरेश्वर व रुग्णालयीन स्टाफ उपस्थित होते.

  मोळवणे सरांनी आयुर्वेद उपचार स्वानुभव विशद केला,त्यांनी दिनचर्या व आहारामुळे त्यांच्यात झालेला अनुकूल बदल बाबत सांगितले. उपस्थितांना जीर्ण आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब,कॅन्सर या सारख्या विकाराना प्रतिबंध व रोखण्यासाठी  आयुर्वेद ,योग प्राणायाम,युनानी सिध्द व होमियोपॅथी चे महत्व विशद केले. यावेळी सुत्रसंचालन श्री. तुंदारे परमेश्वर यांनी केले वैद्यकीय अधिक्षक डॉ. कपीलदेव पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. गरड सर यांनी आयुर्वेदासंदर्भात मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार श्री. उबाळे उत्रेश्वर यांनी मानले. 

 
Top