कळंब/ प्रतिनिधी -

कर्नाटकातील उजळंब येथे 25000 दीप प्रज्वलनातून साकारली जाणार जगातली पहिली शिवरायांची विश्वविक्रमी  दीपज्योत शिवप्रतिमा कळंब येथील कलाकार राजकुमार कुंभार यांच्या  संकल्पनेतून छत्रपती शिवरायांची तब्बल पंचवीस हजार दिव्यांच्या दीपप्रज्वलनातून एक आगळीवेगळी संकल्पना साकारण्याचा एक अनोखा संकल्प तडीस नेला जाणार आहे.कलाकृती दिनांक 10 नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने कर्नाटक राज्यात बिदर जिल्ह्यात बसवकल्याण  तालुक्यातील उजळंब या गावी साकारली जात आहे .

कार्यक्रमाचे आयोजन उजळंब येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्या मार्फत करण्यात आले असून ही संकल्पना महाराष्ट्रातील  कळंब शिराढोण येथील कलाकार राजकुमार कुंभार यांच्या नेतृत्वात साकारली जाणार आहे. या कलाकृतीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन  दीपप्रज्वलनातून शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर मांडण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न असणार आहे .

 
Top