उस्मानाबाद दि.५ (प्रतिनिधी) - अन्वय नाईक यांच्याप्रमाणेच माझे पती दिलीप शंकरराव ढवळे यांच्या आत्महत्या जबाबदार असणाऱ्या आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी मयत दिलीप ढवळे यांच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

उंबरे कोठा परिसरात असलेल्या त्यांच्या घरी दि.५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मयत दिलीप ढवळे यांच्या मातोश्री सोजर ढवळे मुलगा दिपक ढवळे व दिलीप  ढवळे यांचे बंधू राजेंद्र ढवळे हे उपस्थित होते. पुढे बोलताना वंदना ढवळे म्हणाले की सर्वप्रथम अन्वय नाईक यांच्या पत्नीचे म्हणणे ऐकून तत्परतेने कायदेशीर कारवाई अनुसरला बद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करते अगदी त्याचप्रमाणे मागील वर्षभरापासून न्यायासाठी सुरू असलेली माझी आणि माझ्या अनाथ मुलांची फरफट मुख्यमंत्र्यांनी थांबवावी ही माझी विनंती असून उस्मानाबाद येथे एका राजकीय प्रचार सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी ढवळे कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही असे जाहीर अभिवचन दिले होते आपल्या पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे माझे पती दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केलेले असून आमच्या मालकीची जमीन अद्यापही बँकेकडे गहाण आहे गुन्हा दाखल होऊन वर्षभराचा कालावधी लोटला तरीही ही आजपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही विशेष म्हणजे सर्व आरोपी मोकाट असून गुन्ह्याच्या तपासावर त्याचा परिणाम होत आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवितास ही त्यांच्यापासून धोका निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी अन्वय नाईक प्रकरणी जी संवेदनशीलता दाखवली अगदी त्याप्रमाणे तत्परता दाखवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे सांगून त्या म्हणाल्या की दिनांक १२ एप्रिल २०१९ रोजी पहाटे पाचच्या दरम्यान शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या माझ्या पतीने केली. पोलिसांना त्यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी व पत्र सापडले.  त्यानुसार पोलिसांनी तब्बल पाच महिन्यांनी खासदार राजे निंबाळकर आणि त्यांच्या मातोश्री तेरणा कारखान्याच्या तत्कालीन अध्यक्ष आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्यासह वसंत दादा सहकारी बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक व जय लक्ष्मी शुगर कारखान्याचे चेअरमन यांच्यासह सर्व संचालक मंडळावर गुन्हा हा दाखल केला.

गुन्हा दाखल होऊन बराच अवधी लोटला मात्र अद्यापि याप्रकरणी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नसून दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी आमच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून त्यांनीही जाहीर सभेत न्याय देवू अशी ग्वाही दिली होती आपण एक संवेदनशील नेते म्हणून ओळखले जाता तसेच महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुख पदी असल्यामुळे आपल्याकडून एका शेतकरी कुटुंबाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला न्याय मिळावा यासाठी दोन दिवसांमध्ये आम्ही ही मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार असून त्यांनी  आमचे दुःख समजून घ्यावे व अन्वय नाईक यांच्या कुटुंबाला जसा न्याय दिला तसाच न्याय आम्हालाही मिळवून द्यावा, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

 
Top