लोहारा/प्रतिनिधी

समाजामध्ये जेष्ठांना सन्मानाची वागणुक मिळायला हवी. सांभाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आजचे युवक भौतीक सुखाच्या मागे लागले असुन त्यांच्यावतीने आई वडीलांचा आदर होणे गरजेचे आहे. जेष्ठांचे अश्रु पुसणे कोणत्याही समाजसेवेपेक्षा श्रेष्ठ आहे, असे मत उमरगा तहसिलदार संजय पवार यांनी व्यक्त केले.

 दाळिंब येथील बाबा जाफरी सोशल फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आधार सेवा केंद्रातील वृध्द व्यक्तीना दिपावळीनिमीत्त पूर्ण आहेर करून अनोखी दिवाळी दि.15 नोव्हेंबर  रोजी साजरी करण्यात आली. त्यावेळी तहसिलदार श्री. पवार प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. सोसायटीचे माजी चेअरमन बाबुरावजी टिकांबरे अध्यक्षस्थानी होते. रोटरीचे माजी सचिव प्रा. युसूफ मुल्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन गुंड, सामाजीक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, मधुकर जाधव गुरुजी, डोंगरे गुरुजी, जब्बार पटेल, इकबाल चौधरी, सचिन बिद्री, नामदेव फडताळे, पोलीस पाटील अश्विनी वाले यांची यावेळी उपस्थित होते.

 पुढे बोलताना तहसिलदार पवार म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून दाळींब येथे चालविण्यात येणाऱ्या भोजन सेवा केंद्राच्या वतीने गावातील ४२ वृध्द निराधार, गरजू व्यक्तींना दोन वेळेचे मोफत जेवण दिले जाते. या वृंध्दांना  सणाचा आनंद मिळावा त्यांचा प्रत्येक दिवस हसत हसत घालवता यावं यासाठी बाबा जाफरी यांच्या वतीने विविध माध्यमातुन मदत केली जाते हे अभिनंदनीय कार्य असुन युवकांनी या कार्याचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे सांगितले. 

यावेळी वैद्यकीय नीट परिक्षेत यश संपादन करून प्रवेश मिळविलेल्या मंगेश पाटील या विद्यार्थ्याचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. मुल्ला, श्री . टिकांबरे व श्री. डोंगरे गुरुजी यांनी आपल्या भाषणात बाबा जाफरी यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी गावातील अनेकांनी या केंद्रास धान्याच्या स्वरूपात मदत देण्याचे जाहीर केले. वृध्द सेवा केंद्राचे संचालक तथा सामाजीक कार्यकर्ते बाबा जाफरी यांनी प्रास्ताविक केले. बसवराज सारने यांनी सुत्र संचलन केले तर गणेश इगवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली सेवा संघ, इरफान जहागीरदार, बालाजी सातपुते, आसिफ शिलार, ओम टिकांबरे, महमद शेख, सलमान कमाल, मंगेश स्वामी आदींनी यासाठी पुढाकार घेतला

 
Top