वारकरी संप्रदायातील थोर संत श्री. सत गोरोबा काकांच्या राहत्या घराचे महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने लाखो रुपयांचा चुराडा करून नव्याने करण्यात आलेल्या घराच्या बांधकामाच्या माळवदाचे सागवानी लाकुड रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोसळले आहे.
जागतीक पातळीवर ऐतिहासिक महत्व असलेल्या तसेच धार्मिक क्षेत्रातही सर्व दूर परिचीत असलेल्या वारकरी संप्रदायातील थोर संत श्री. सत गोरोबा काका याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तेर ता. उस्मानाबाद येथील बाराव्या शतकात होऊन गेलेल्या व कुंभार संत श्रेष्ठ वैराग्यमहामेरु श्री. संत गोरोबा काका याचे राहते घर असल्याने या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक ,भावीकभक्त, नागरीक येतात.परंतु गोरोबा काकाच्या घराची मोठया प्रमाणात दूरवस्था झाल्यामुळे इतिहास प्रेमी, सशोधक नागरिकातून तीव्र संताप होत होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या वतिने गोरोबा काकाच्या घरांच्या बांधकामास सन 2012-13 मध्ये 25 लाख रुपये निधी मंजूर झाल्यानंतर गोरोबा काकाच्या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु 25 लाख रुपयांचा चुराडा करूनही घराची मोठया प्रमाणात दूरवस्था झाल्यामुळे भिंतीवरील मातीचा लावलेला लेपही ढासळत असल्याने तसेच पावसाळ्यात सॅपला गळती लागत असल्याने इतिहास प्रेमी, नागरिकातून तीव्र संताप होत होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या वतिने सन २०१५-१६ मध्ये पुन्हा गोरोबा काकाच्या घरांच्या बांधकामास 77 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर गोरोबा काकाच्या घरांचे बांधकाम नव्याने करण्यात आले. सध्या गोरोबा काकाच्या घरांचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्षांचा कालावधी ही पूर्ण होत नाही तोपर्यंतच घराच्या माळवदास बसविण्यात आलेल्या सागवानास वाळवी लागल्याने रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माळवादाचे सागवानी लाकुड कोसळले आहे तर इतरही माळवदाची सागवानी लाकडे कधी कोसळतील हे सांगता येत नाही त्यामुळे गोरोबा काकांच्या राहत्या घराचे निकृष्ट कामांची चौकशी करून संबंधित गुतेदारासह अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी भाविकांसह नागरिकांतून होत आहे.
