उस्मानाबाद/ प्रतिनिधी
सन 2018-19 व 2019-20 या शैख्णिक वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची व महाविद्यालयाची शिष्यवृतीय अद्याप बॅक खात्यावर जमा न झालेल्या कारणांसह यादी महाविद्यालयास देण्यात आली आहे. तसेच महाविद्यालय लॉगीन मध्येही सदर यादी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
महाविद्यालयानी सदर विद्यार्थ्यांशी तात्काळ संपर्क साधून दिलेल्या कारणांची र्योग्य ती त्रुटीची पुर्तता तात्काळ करण्यात यावी अन्यथा सदर विद्यार्थी व महाविद्यालयाची व विद्यार्थ्यांची रक्कम जमा न झाल्यास याची जबाबदारी महाविद्यालयाची व विद्यार्थ्यांची राहील. या त्रुटीची पुर्तता दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत पुर्ण करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बी.जी.अरवत यांनी पत्रकाद्वारे केले आहे.