जिल्हा परिषद कृषी विभागात नियमाचे पायमल्ली करून बायोगॅस यंत्रणा उभारणी आंदोलन वाट पाहत पाणबुडी संच अनुदान वाटपात तसेच कृषी अनुदान वाटपात लाखो रूपयाचा भ्रष्टाचार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पीजी चीमन शेटे व संबंधित अधिकाऱ्यांशी संगणमत करून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे अनुदानाची रकमेचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे कृषी अधिकारी चिमनशेंटे यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाचे नियम डावलून नियमबाह्य पद्धतीने कारभार सुरू आहे जिल्हा परिषदेसह शासन निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या नोंदणी कसल्याही प्रकारचे पडताळणी केली नसल्याची गंभीर बाब लेखा परिक्षण अहवालातून समोर आले आहे याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनाही अंधारात ठेवण्यात आले आहे त्यामुळे साहित्य खरेदी मोठा भ्रष्टाचार झाला आहे तसेच अनुदानापासून दिव्यांगा सह महिलांनाही या अनुदानाचा लाभ दिला गेला नाही तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कृषी विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद कृषी विभागात खळखट्याक आंदोलन करण्यात येईल आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आले. यावेळी सागर बारकुल कळंब तालुका अध्यक्ष,मुरली देशमुख तावरजखेडा सरपंच,चंद्रकांत शेटे, ग्रामपंचायत सदस्य, सौरभ देशमुख विद्यार्थी सेना जिल्हाउपाध्यक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते