उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हयात महिला व मुलींच्या सहभागी व शाश्वत विकासाचा प्रकल्प उस्मानाबाद जिल्हा हा मानवी विकासाच्या बाबतील भारतातील ११२ व्या क्रमांकावर असुन कमी विकसीत जिल्हयांपैकी एक. मुख्यत्वे शेतीवर अवलंबुन अर्थव्यवस्था असली तरी दुष्काळ, वाढलेला खर्चाची ताळमेल यातुन समस्या अजुन बिकटच होते.

याचा विचार करुन स्वयम्‌  शिक्षण प्रयोगने युरोपीयन युनियनच्या पाठबळातून उस्मानाबाद जिल्हयात सहभागी व शाश्वत विकासाच्या प्रकल्पाची सुरुवात केली.  २२ आक्टोबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.नवळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री. डॉ. आघाव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,.डॉ.जाधव, कृषी अधिकारी,समाधान जोगदंड, डिएमएम, उमेद, श गुरु भांगे, उमेद व उस्मानाबादच्या निमंत्रीत ५० महिला उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विविध माहिती व मार्गदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आहे. व या प्रकल्पाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन युरोपियन युनियनच्या प्रमुख श्रीमती सीसीलिया कोष्टा यांनी केले. 

हा कार्यक्रम उस्मानाबादच्या यशवंतराव सभागृहात सामाजिक अंतर पाळत आयोजित केला होता. तसेच युरोपियन युनियनच्या प्रतिनिधीसह २२ देशातील प्रतिनिधीही व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे या कार्यक्रमास मार्गदर्शन केले. एकूण १९८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी या उपक्रमाची प्रशंसाही केली. या कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्हयात २ डाळ उत्पादक संघ व १६ दूध संकलन संघ महिलांनी एकत्र येवून सुरु केले आहेत. शिवाय भाजीपाला व शेळी पालनाच्या माध्यमातून महिलांना मुल्यवर्धन साखळीचा फायदाही करुन दिला जाणार आहे. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.उपमन्यु पाटील यांनी प्रकल्पाची ओळख व स्वयम्‌  शिक्षण प्रयोगचे कार्य मांडले. माधवी यांनी आपले अनुभव असे मांडले कोरोनाच्या काळातही आम्ही व्यवसायीक बनल्यामुळे फायदेशिर व्यवसाय करत आहोत. आधी आम्ही घरात बेकार होतो. आता गाव व परिसरातही व्यवसाय सुरु करुन कमाई करत आहोत. सीसिलीया कोष्टा,युरोपियन युनियन यांनी स्त्री-पुरुष समानता, महिला सक्षमीकरण क्षेत्रात स्वयम्‌  शिक्षण प्रयोग करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. सक्षमीकरणासोबत महिलांनी नेतृत्वाचीही संधी मिळत असल्याने प्रगतीच्या वाटा रुंदावल्या, यापुढे कोणीही मागे राहणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.  सुनिता क्षिरसागर यांच्या मते महिलांनी आता शेती व बिगरशेती क्षेत्रात चांगले पाय रोऊन उत्पन्न व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. यातून शाश्वत व मजबूत असे मुल्यवर्धन होईल. माझी ३ एकर शेती मी आता संपुर्ण सेंद्रीय केली आहे. शिवाय २० महिला एकत्र येऊन शेतीचे उत्पादन ४ बाजारात विकत आहोत. सेंद्रीयचा स्विकार व रासायनिकचा वापर थांबवल्याने आहार व आरोग्य सुरक्षा लाभली आहे. आमच्या या उपक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

प्रियंका पासले यांनी उस्मानाबाद जिल्हयात २० दूध संकलन केंद्राव्दारे महिलांनी आता मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन सुरु केले आहे. ५ लिटरवर आम्ही आधी होतो आता ५०० लिटरचे दूध संकलन करत आहोत. लवकरच ५ हजार लिटर दूध संकलनाचे आमचे ध्येय आहे. भाग्यश्री या आधी शेतकरी कुटुंबातील साधारण गृहीणी होत्या आता त्यांनी २ एकर सेंद्रीय शेती व गांडुळ खताचे उत्पादन सुरु केले आहे. १० महिलांनी एकत्र येत त्यांनी कुटुंबातील लोकांनीही सोबतीला घेऊन कच-यापासुन खत निर्मिती सुरु केली आहे.लुडोविका, इटली या २ हजार सदस्य असलेल्या संस्थेच्या प्रतिनिधी, यांचे कार्य ३१ देशात सुरु आहे. महिलांचे सक्षमीकरण व संस्था विकासाचे महत्व विषद केले. दक्षिण अमेरीका, मध्य अशिया,रशिया व भारतात हे कार्य कसे विस्तारता येईल याचे महत्व कथन केले. या प्रकल्पास मार्गदर्शन,प्रशिक्षण करतांना महिला व मुलींना याचा लाभ देवू. मुल्यवर्धन व सहभागासाठी कार्य करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

कार्यक्रमाची सांगाता श्री. विनोद मेनन, सदस्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन परिषद यांनी केले. स्वयम्‌  शिक्षण प्रयोगच्या मार्गदर्शनाखाली ७ राज्यात महिला शेतकरी कशा पुढे आल्या आहेत याची माहिती त्यांनी दिली.

 
Top