उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तालुक्यातील कामेगाव येथील आर्ट ऑफ लिव्हींगचे योग शिक्षक तानाजी एस. माने यांची आयुष इंटरनॅशनल असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन राजे-पाटील, डॉ. दिशा चव्हाण, महाराष्ट्र योग अध्यक्ष डॉ. धिरजकुमार मेश्राम, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. रोनक पालघमोल, जिल्हाध्यक्ष संदिप सोनवणे यांनी ही निवड केली आहे. तानाजी माने यांनी ग्रामीण भागात अनेक गावात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण दिले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगाचार्य रामभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक वर्षापासून प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. कामेगाव येथील अनेक नागरिक, जिल्हा परिषद शाळा, यशवंत विद्यामंदिर शाळा येथील कर्मचार्‍यांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. तसेच परिसरातील अनेक गावातही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. सध्या कोरोना महामारीच्या काळात योगा प्रशिक्षण ही काळाजी गरज आहे. त्यानुसार ते प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशने त्यांची उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे योगाचार्य रामभाऊ कदम, डॉ. विकास गपाट, विकास गाडेकर, लातूरचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे.

 
Top