उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम, 2020 प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
मी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार खालील तक्त्यात नमूद अधिकारी यांची सेवा जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे सहाय्यक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कामकाज करणेसाठी अधिग्रहित करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
सेवा अधिग्रहित केलेल्या अधिकारी यांचे नाव व व पदनाम पुढीलप्रमाणे आहे.श्री काशीद, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, उस्मानाबाद यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे रुजू व्हावे व सहाय्यक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून पुढीलप्रमाणे कामकाज करावे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांचे नियंत्रणाखाली त्यांनी नेमून दिलेले कामकाज करणे व त्यांना त्यांचे कामकाजात आवश्यक ते सहाय्य करणे,या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असे आदेशात नमुद केले आहेत.