तुळजापूर / प्रतिनिधी
 गुरुवारी (दि.३०) सायंकाळी शहरातील जवाहर गल्ली येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आठ दिवसात शहरात दोन युवकांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.
जवाहर गल्लीतील नितेश दिलीप कदम (३०) या युवकाने गुरूवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याचा पश्चात आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी घाटशिळ रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top