उस्मानाबाद / प्रतिनिधी-
देशाची खो-खोपटु आणि उस्मानाबादची भूमिपुत्री सारिका काळे हिला खेळात नैपुण्य कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतंच यादी जाहीर झाली असून देशातील विविध खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने नवाजल जाणार आहे. यात खो-खोपटू सारिका काळे हिच्यासह क्रिकेटपटू इशांत शर्मा, कुस्तीपटू साक्षी मलिक यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. सारिका ही मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर या गावाची आहे.
देशपातळीवरील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने उस्मानाबादच्या भूमिपुत्रीचा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांची कॉलर टाईट झाली आहे.अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सारिकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलं आहे. साल 2015-16 मध्ये प्रथमच भारतीय संघात निवड व भारतास सुवर्णपदक मिळवून दिले. सन 2016 मध्ये आसाम गोहाटी येथे खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड व तेथेही सुवर्णपदक पटकाविले.
सारिकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश संपादन केले आहे. मैदानावरील सातत्य, 14 वर्षे अविरतपणे रोज सराव, काहीवेळा उपाशीपोटी पण सराव केला. सारिका मितभाषी असून गुणी खेळाडू आहे पण मैदानावर मात्र ती फार आक्रमक खेळी करते, अशी प्रतिक्रिया सारिकाचे प्रशिक्षक उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. चंद्रजित जाधव यांनी दिली.्र
रुईभर येथील या कुमारिकेने महाराष्ट्र खो-खो संघाच्या कर्णधारपदी 4 वेळा, भारत देशाच्या खो-खो संघाच्या कर्णधारपदी 1 वेळा राहून भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात यशस्वी भूमिका बजावली आहे. तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खो-खो संघाची सदस्य व तिसऱ्या आशियायी क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमानही प्राप्त केला आहे.
यापूर्वी देखील तिला शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. वडील अपंग असल्याने घरची सर्व जबाबदारी आईवर होती. आई लोकांच्या घरी घरकाम करून उदरनिर्वाह करत होती. मात्र सारिकाने घरातील नव्हे तर देशाच्या खो-खो संघालाही उजेडात आणले आहे. 26 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 5 लाख इनामाची राशी, अर्जुनाचा ब्रॉंझ धातूचा पुतळा आणि स्क्रोल देऊन सन्मानित केलं जाणार आहे.