लोहारा/ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्षपदी लोहारा शहरातील जालिंदर कोकणे यांची नियुक्ती झाली. कोकणे यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणूक लढवली होती. मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम यांनी कोकणे यांना नियुक्तीपत्र दिले. विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंके, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, उमरगा तालुकाध्यक्ष हरिदास जाधव, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे, लोहारा शहराध्यक्ष प्रवीण संगशेट्टी आदींनी जालिंदर कोकणे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

 
Top