उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तुळजापूर तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून तालुकाध्यक्षपदी मल्लिकार्जुन कुंभार यांची निवड झाली.या कार्यकारणीची निवड प्रक्रिया राज्य उपाध्यक्ष जावेदभाई शेख, जिल्हा संघटक अमर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या जिल्हा व तुळजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या.
यामध्ये तालुकाध्यक्षपदी कुंभार, जिल्हा सचिव म्हणून जोतिबा येडगे, जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, तुळजापूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मयुर गाढवे, तालुकासचिव धनाजी साठे, तालुका उपाध्यक्ष रोहित दळवी, राहुल गायकवाड, प्रशांत डोलारे व शिवाजी झाडपिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
Top