भूम /प्रतिनिधी
 महाराष्ट्र ची लालपरी वाहू लागली शेतकऱ्यांचा माल त्यामुळे  व्यापारी व शेतकऱ्यांनमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.  भूम तालुक्यातील लोकांना जिल्हा अंतर्गत एस टी बसची सेवा सुरू करून पंधरा दिवस उलटले असताना प्रवासी मात्र एसटी कडे पाठ फिरवून आहेत म्हणावे तसे प्रवासी येत नसल्याने व एसटी चालू झाली कळावे या साठी अखेर शेतमाल वाहतुकीची पाळी एसटी ला आली आहे जेणे करून लोकांमध्ये एसटी निर्जंतुक माल घेऊन जाते सोबत प्रवासाच्या हिताने प्रवास करते हे दाखवून देत भूम एसटी आगार कडून आज सोयाबीन ,इतर अन्न धान्य कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी यांच्या कडून उचलले जात आहे.
 भूम ते बार्शी पहिल्या वाहतूक  गाडीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मस्कर,  उपसभापती नामदेव नागरगोजे एसटी आगारचे सत्यशील खनाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यापारी सिराज मुलांनी, अप्पा उंबरे, छोटू वऱ्हाडे, बोराडे सह एसटी चालक माळी,वाघमारे, तांत्रिक उमेश उखनडे, भारत साठे बाजार समितीचे सचिव अखिल सय्यद, सतीश भोळे ऍड सचिन मोटे उपस्थित होते.
 
Top