तुळजापूर/ प्रतिनिधी -
 तालुक्यात कृषी विभागाने यंदा खरीप  हंगाम पेरणी मोठ्या प्रमाणात होईल असे गृहीत धरुन तुळजापूर तालुक्याचे सरासरी खरीप पेरणी क्षेत्र 79300हेक्टर असताना 101598 हेक्टर क्षेत्रात पेरणी होईल  अशी शक्यता गृहीत धरुन नियोजन केले आहे. मागील वर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने यंदा सध्या तलावांन सह विहीरी बोअरला पाणी असल्याने यंदा खरीप पिक लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
कोरोना मुळे लोक गावातच थांबल्याने यंदा शेती मशागत कामे वेळेत पुर्ण झाली आहेत. यंदा सोयाबीन  उडीद कापुस  या पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची  शक्यता कृषी विभागाने धरली आहे. तुळजापूर तालुक्यात सरासरी खरीप पेरणी क्षेत्र 79300 हेक्टर असुन 2018-19 मध्ये 95415 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती आता 2020-21 मध्ये 101598 हेक्टर क्षेञात  पेरणी होईल,असे  गृहीत धरुन नियोजन केले आहे. तुळजापूर तालुक्याचे भौगोलिक 139268 क्षेत्र इतके असुन वहीती खाली1 233 24 हेक्टर इतके आहे खरीप हंगम 2020-21   निहाय नियोजन पुढीलप्रमाणे पिकाचे नाव सरासरी क्षेत्र कंसात 2020-21मध्ये होणारे पेरणी क्षेत्र .भात 3500(360.90)हेक्टर,  ज्वारी 4000(1283.20) हेक्टर , बाजारी 2200(514),मका 7100(2107.60),तूर 25500 (12299.20) मुग 8200(4264.90), उडीद 3900(6769.50), भुईमुंग 2300(614.90), तीळ 400(79), सुर्यफुल 4800(234),कारळ 1100(96.50) सोयाबीन 15400 (71168.27) कापुस (96)

 
Top