लोहारा/प्रतिनिधी
कोरोना संकट दिवसेंदिवस वाढतच असल्याने महापुरुषांच्या जयंत्या घरातच साध्या पद्धतीने साजरा करताना सर्वत्र दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन होत असल्याचे यावरून दिसून येते. अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती देखील मुरूम शहर व परिसरातील घरा - घरातच साजरी करण्यात आली.
मुरूम शहर व परिसरात डॉ.राजू शेंडगे, डॉ.सचिन शेंडगे, विजयाताई सोनकाटे, शिक्षकनेते प्रदिप मदने, डॉ.विजय बेडजुर्गे,माजी प्राचार्य गोरख घोडके, प्रा.अशोक दूधभाते,  माजी सैनिक खंडू दूधभाते, प्रा.डॉ.राम सोलंकर, चंद्रकांत बनसोडे गुरूजी, सामाजिक कार्यकर्ते राघवेंद्र गावडे, प्रा.डॉ.सायबण्णा घोडके,प्रा. संतोबा दूधभाते, डॉ.किशोर घोडके, गावडे बुवा, सहशिक्षक रमेश लोकरे, शिवाजी चेंडके, हणमंत शिंदे, विजय घोडके, गुंडू दूधभाते, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, सुर्यकांत दूधभाते, सुभाष सोलंकर, प्रा.डॉ.आप्पासाहेब सोनकाटे, आण्णाराव पाटील, देविदास बनसोडे आदींच्या पुढाकारातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरातच राहून साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर व परिसरातील बेळंब, भुसणी, सुंदरवाडी, आष्टाकासार,येणेगूर, दस्तापूर, दाळींब, अचलेर, केसरजवळगा, कदेर, कसगी, कसगीवाडी, गुंजोटी आदी गावात या आव्हानाला प्रतिसाद देत जयंती साजरी केली. अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शारीरिक अंतर ठेवून अभिवादन करण्यात आले. या जयंती प्रसंगी अनेक ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे वाचन लहान बालकांनी केले. होळकर यांनी प्रतिकुल काळात एक कुशल राजकारणी, कर्तव्यदक्ष प्रशासक, एक आदर्श स्त्री राज्यकर्त्या म्हणून इतिहासाने त्यांच्या कार्याची दखल आणि नोंद घेतल्याच्या गोष्टी, जनतेची प्रगती व विकास साधताना सामाजिक भान व शांतता ठेवून समाजात स्वातंत्र्य, समता व न्याय या मुलभूत मानवी मूल्यांना होळकर यांनी प्रशासन करताना त्याकाळी विशेष प्राधान्य असे दिले अशा कितीतरी घटना व उदाहरणे इतिहासात नोंदविल्या गेल्याची चर्चा यावेळी बालगोपाळांनी केली.

 
Top