कळंब / भिकाजी जाधव -
“प्रत्येक यशस्वी पुरुषाचा पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो” असे आपण नेहमी ऐकतो.. पण एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे सुद्धा एका पुरुषाचा हात असतो बर का.. मित्रांनो.. मग तो तिचा वडील असेल, भाऊ असेल, आजोबा असेल, मामा असेल, चुलता असेल किंवा पती असेल.. अशाच एका यशस्वी.. कोरोनो योध्याची बातमी आपल्या पर्यंत मी पोहचवतोय... पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात एका नामांकित हॉस्पिटल मध्ये परिचारिका असलेल्या आणि सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करत असलेल्या, प्रसिद्धी पासून नेहमी दूर असलेल्या
  या कोरोना योद्धा आहेत, सौ. विद्या लहू लोखंडे,  यांचं मूळ गांव बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील उमरी हे आहे, त्यांचं माहेर केज आहे, त्यांचे पती लहू लोखंडे यांची त्यांना मोठी साथ आहे... म्हणूनच मी सुरुवातीला म्हण्टलं आहे की स्त्रीच्या यशस्वीतेमागे पुरुषाचा देखील हात असतो.. या पती पत्नीस एक मुलगा आणि मुलगी आहे, मुलं लहान असल्यामुळे त्यांची देखभाल आता लहू यांना करावी लागते आहे.
2013 साली ANM चा कोर्स विद्याताई यांनी कंप्लेट केल्यानंतर कळंब जि. उस्मानाबाद येथील डॉक्टर जाधवर यांच्या ओम बालरुग्णालयात शिकाऊ नर्स चे काम केलंय त्यानंतर 2015 मध्ये बीडला GNM चा कोर्स त्यांनी पूर्ण करून औरंगाबाद येथे एका नामांकित रुग्णालयात आपत्कालीन विभागात तीन वर्ष काम केल.. आणि 2019 पासून आजतागायत त्या पिंपरी चिंचवड भागातील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये RICU विभागात कोरोनाग्रस्त रुग्णाची त्या सेवा करतायत, जिथे एकदा सुरक्षा कवच (पीपीटी किट) अंगावर परिधान केल्यानंतर आठ तास ड्युटी संपेपर्यंत पाणी देखील पिता येत नाही.. अशा या कोरोना वॉरियर्सला “माझी बातमी” चा सलाम... त्यांच्या मागे खंबीर पणे उभे असलेले त्यांचे पती आणि मुलांना देखील .. सलाम कारण ते त्यांना कोरोना महामारी विरुद्ध लढण्यासाठी बळ देत आहेत.
 विद्याताई म्हणाल्या सर्वांनी नियम पाळायला हवेत, सुरक्षित फिजिकल डिस्टन्स ठेवावा, तोंडाला, नाकाला मास्क किंवा हातरुमाल यांनी झाकावे, विनाकारण गर्दी करू नये, स्वतःच्या जिवापेक्षा कांहीही अत्यावश्यक नाही, व्हेंटीलेटर पर्यंत येण्यापेक्षा घरी राहणे उत्तम असेल, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, वीजकर्मचारी, गॅस सेवा देणारे कर्मचारी, बँक सेवा कर्मचारी, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते, सुरक्षा रक्षक हे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घराच्या बाहेर जाऊन परत आपल्या घराकडे येतात तेंव्हा त्यांना आपल्या कुटुंबाची खूप काळजी वाटत असते, त्यामुळे सर्वांनी वेळोवेळी शासनाने दिलेले सर्व नियम पाळावेत.

 
Top